आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्‍तानात 10 परदेशी पर्यटकांची गोळ्या घालून हत्‍या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्‍लामाबाद- पाकिस्‍तानमध्‍ये अज्ञात हल्‍लेखोरांनी एका हॉटेलमध्‍ये घुसुन 10 परदेशी पर्यटकांची गोळ्या घालून हत्‍या केली. यामध्‍ये चीन, रशिया आणि युक्रेनच्‍या पर्यटकांचा समावेश आहे.

बंदूकधारी हल्‍लेखोरांनी गिलगिट येथील एका हॉटेलवर लक्ष्‍य केले. याठिकाणाहून नंगा पर्वतावर चढण्‍यासाठी गिर्यारोहक बेस कॅम्‍प म्‍हणून वापर करतात. पर्वतावर चढाई करण्‍यासाठी काही परदेशी पर्यटक हॉटेलमध्‍ये थांबले होते. रात्री अचानक त्‍यांच्‍यावर हल्‍ला करण्‍यात आला. बेछूट गोळीबार करुन 10 पर्यटकांची हत्‍या करण्‍यात आली. त्‍यात युक्रेनचे 5, चीनचे 3 आणि रशिया तसेच पाकिस्‍तानच्‍या एका पर्यटकाचा समावेश आहे.

अशा प्रकारची घटना गिलगिट भागात प्रथमच घडली आहे. मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक या भागात येतात. त्‍यामुळे सुर‍क्षेवर प्रश्‍नचिन्‍ह निर्माण झाले आहे. परदेशी पर्यटकांची हत्‍या करण्‍यात आल्‍यामुळे आंतरराष्‍ट्रीय समुदायाकडूनही तीव्र प्रतिक्रीया उमटण्‍याची शक्‍यता आहे.

हा भाग काश्मिरच्‍या सीमेला लागून आहे. गिलगिटचा परिसर सुरक्षित समजला जातो. घटना घडली तो परिसर दुर्गम आहे. तिथे पोहोचण्‍यासाठी रस्‍ते अतिशय खराब आहेत. त्‍यामुळे मृतदेहांना हेलिकॉप्‍टरद्वारे इस्‍लामाबादला आणण्‍यात येणार आहे. आतापर्यंत कोणीही या हल्‍ल्‍याची जबाबदारी स्विकारलेली नाही.