आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Gurudwara Shooting: Obama Calls For 'soul Searching' ‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जरा आत्मपरीक्षण करा; बराक ओबामांचा अमेरिकी नागरिकांना सल्ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, नवी दिल्ली - विस्कॉन्सिन गुरुद्वारातील हल्ल्याच्या धक्क्यातून अमेरिका, विशेषत: शीख समुदाय अद्याप सावरलेला नाही. मृतांच्या आत्म्याला शांतता मिळावी यासाठी सोमवारी देशभरात ठिक ठिकाणी शोकसभा आयोजित करण्यात आल्या होत्या. या निर्घृण हत्येमुळे व्यथित झालेल्या राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी देशवासीयांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे.
गुरुद्वारातील हल्ल्यामुळे अमेरिकी नागरिकही व्यथित झाले आहेत. हा हल्ला वर्णविद्वेषातून झाला असेल तर नागरिकांनी आत्मपरीक्षण करावयास हवे, असा सल्ला राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी नागरिकांना दिला आहे. आपल्या देशात क ोण कुठून आले, त्यांचा धर्म, वर्ण असा भेद न करता एकमेकांचा आदर, सन्मान केला पाहिजे. वर्णभेदी विचारांना नागरिकांनी थारा देता कामा नये, असे ओबामा म्हणाले. व्हाइट हाऊसमधील ओव्हल कार्यालयात ते बोलत होते. दरम्यान, गुरुद्वारातील मृतांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देशभरातील सरकारी कार्यालयांवरचे राष्ट्रध्वज 10 ऑगस्टपर्यंत अर्ध्यावर ठेवण्याचे आदेश ओबामा यांनी दिले.
हल्लेखोर वेड मायकेल पेजच्या डोक्यात वर्णद्वेषाचे विष पुरते भिनलेले होते. गौरवर्णाचा दुरभिमान बाळगणा-या चळवळीशी त्याचा संबंध होता. तो नियमितपणे त्यांच्या बैठकांनाही हजेरी लावत असे. ज्यू आणि कृष्णवर्णीयांची हत्या करण्याचा संदेश संगीतातून देणा-या ‘एंड अपाथी’ या रॉक बँडशीही त्याचे लागेबांधे असल्याचे एफबीआयच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
कृष्णा यांचा हिलरींना फोन - वर्णद्वेषातून गुरुद्वारावर हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्यामुळे भारताने कडक शब्दांत निषेध नोंदवला असून अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी मागितली आहे. सोमवारी रात्री परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्याशी फोनवर बोलणी केली. त्या सध्या दक्षिण आफ्रिका दौ-यावर आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारताला वाटत असलेली चिंता त्यांच्या कानावर घातली. त्याचबरोबर भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेबद्दल तसेच त्यांच्या हिताची काळजी घेतली जाईल, अशी हमी ओबामा प्रशासनाने द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
मशिदीला आग - गुरुद्वारावरील हल्ल्याची घटना ताजी असतानाच मिसौरी येथे एक मशीद जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीचे कारण अद्याप कळू शक लेले नाही. मिसौरी येथील इस्लामिक सेंटर ऑफ जॉपलिनला सोमवारी ही आग लागली. सुदैवाने त्या वेळी मशिदीत कुणीही नव्हते. 4 जुलै रोजीही याच ठिकाणी आग लागली होती. महिनाभरातील आगीचीही दुसरी घटना आहे. याप्रकरणी एफबीआय क सून तपास करीत आहे.
शूरवीर सदवंत कालेका - रविवारी माथेफिरू वेड मायकेल पेज अंदाधुंद गोळीबार करीत गुरुद्वारात घुसल्यानंतर विस्कॉन्सिन गुरुद्वाराचे प्रमुख आणि संस्थापक सदवंत सिंग कालेका यांनी त्याच्याशी मोठ्या धाडसाने मुकाबला के ला; परंतु पेजसोबत झालेल्या झटापटीत हा निधड्या छातीचा वीर धारातीर्थी पडला. हल्ल्यावेळी काही महिला व मुले लंगरसाठी स्वयंपाक करीत होती. वेड जेव्हा 9 एमएमची गन घेऊन अंदाधुंद गोळीबार करीत गुरुद्वारात घुसला तेव्हा सदवंत यांनी कृपाण घेऊन त्याच्याकडे धाव घेत त्याला जखमी केले; परंतु या झटापटीत पेजने त्यांनाही गोळ्या घातल्या. मोठ्या परिश्रमाने उभारलेल्या गुरुद्वाराचे रक्षण करताना आपले वडील शहीद झाले, असे त्यांचा पुत्र अमरदीप कालेका याने सांगितले. गुरुद्वारा उभारणीतही कालेका यांनी अथक परिश्रम घेतले होते. सन 1982 मध्ये कालेका कुटुंबीय भारतातून अमेरिकेला स्थायिक झाले.तिथेच त्यांनी मेहनतीने उद्योग व्यवसायात यश मिळाले. कुटुंबाला पुरतील एवढ्या कमाईपेक्षा अधिक मिळालेला प्रत्येक डॉलर त्यांनी ओक क्रीक गुरुद्वाराच्या उभारणीत खर्च केला होता.
मृतदेह सरकारी खर्चाने भारतात आणू : बादल