आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुतिन यांच्या प्रेयसीला हवंय लग्न आणि मुले, पाहा 30 वर्षीय एलिनाचा ग्‍लॅमरस लूक...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्‍लादिमीर पुतिन यांच्या अतिशय जवळची मानली जाणारी त्यांच्याच पक्षाची खासदार एलिना काबाएवा हिच्या एका वक्तव्याने दोघांतील संबंधावर अधिकच रहस्य वाढले आहे. तिने एका टीव्ही शो वर सांगितले की, मी ज्या व्यक्तींवर खूप प्रेम करते ती व्यक्ती मला मिळाली आहे. त्या व्यक्तीबरोबर मला लग्न करायचे आहे तसेच मला त्यांच्यापासून मुलेही हवी आहेत.

एलिना यांचे हे वक्तव्य पुतिन यांनी आपले 30 वर्षीय लग्न तोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आले आहे. याबाबत सांगितले जात आहे की, पुतिन यांनी एलिनाबरोबर लग्न करण्यासाठीच पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतला आहे. मात्र दोघांनी सार्वजनिक ठिकाणी याबाबत काहीही वक्तव्य दिलेले नाही.

मिस काबाएवा गोल्‍ड मेडल विजेता जिमनॅस्‍ट असून, सध्या ती पुतिन यांच्या यूनायटेड रशिया पक्षाची ती खासदार आहे. गेल्या पाच वर्षापासून सुरु असलेल्या या प्रेमप्रकरणामुळे राष्‍ट्रीय आणि अंतरराष्‍ट्रीय मीडियात याची खूप चर्चा झाली आहे. मात्र या दोघांनी आपले कोणत्याही प्रकारचे संबंध नसल्याचे म्हटले आहे. याबाबत सांगितले जात आहे की, 60 वर्षीय पुतिन यांच्यापासून 30 वर्षीय काबाएवा यांना एक-दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुलेही आहेत.

या दोघांच्या संबंधला पुष्ठी आता अधिक मिळाली आहे कारण पुतिन यांनी आपल्या 55 वर्षीय पत्‍नी ल्‍यूडमिला हिला घटस्फोट दिला आहे. पुतिन आणि ल्‍यूडमिला गेल्या काही वर्षापासून वेगवेगळे राहत आहेत.

पुतिन यांच्या प्रवक्‍त्यांनी या सर्व बाबींचा इन्कार केला असला तरी बहुतांश रशियन लोक हे मानत आहेत की, पुतिन हे मिस काबाएवा हिच्याशी कधीही लग्न करु शकतात. जर असे घडले तर काबाएवा रशियाची सर्वात युवा प्रथम महिला बनेल. याआधी निकोलस द्वितीय यांची पत्‍नी तसारिना अलेक्‍जेंडर यांना हा गौरव मिळाला होता.

पुढे पाहा, पुतिन आणि एलिना यांची काही ग्‍लॅमरस छायाचित्रे...