आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hafij Saeed Blames India And PM Modi For Peshawar Attack

हाफीजच्या उलट्या बोंबा, म्हणे पेशावर हल्ला भारताने घडवला, मोदींवरही केली टीका VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद/पेशावर - पाकिस्तानच्या पेशावरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर बुधवारी मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी हाफीज सईदने भारताविरुद्ध गरळ ओकली आहे. पेशावरमध्ये झालेल्या हल्ल्यासाठी भारत जबाबदार असल्याचे वक्तव्य हाफीज सईदने केले आहे.
अखेरच्या स्लाईडवर पाहा, हाफीजने केलेल्या वक्तव्यांचा VIDEO
नवाज शरीफ आणि नरेंद्र मोदी यांच्यात फोनवर झालेल्या चर्चेवर भडकलेल्या हाफीजने भारतावर हल्ला करण्याची धमकीही दिली आहे. हल्ल्याचा खरा आरोपी भारत असून भारताचे दुःख व्यक्त करणे म्हणजे मगरीचे अश्रू असल्याचे हाफीज म्हणाला. तसेच या हल्ल्याचा बदला घेण्याची धमकीही त्याने दिली आहे.
दरम्यान, जमात उद दावाचा प्रमुख असलेला मोहम्मद सईद भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. जगभरातील जिहादींवर लक्ष ठेवून असणारी संस्था 'SITE' ने त्यांच्या एका वृत्तामध्ये खुलासा केला आहे की, 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाइंड हाफीज सईद भारतावर हल्ला करू शकतो.
'टाइम्स नाऊ' ने 'SITE INTEL' च्या हवाल्याने ट्वीट केले आहे की, सईद नई दिल्लीच्या दोन मोठ्या हॉटेल किंवा आगरा हायवे दरम्यानच्या एखाद्या ठिकाणाला लक्ष्य करू शकतो.
भारताच्या नऊ शहरांमध्ये अलर्ट
पेशावर हल्ल्यानंतर गुप्तचर संस्थांनी दिल्ली मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, गोवा, इंदूर, जयपूर आणि कोलकाता अशा शहरांत अलर्ट जारी केला आहे.
पुढील स्लाईड्सवर पाहा PHOTO
अखेरच्या स्लाईडवर पाहा, हाफीजने केलेल्या वक्तव्यांचा VIDEO