आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Hafiz Saeed, 26 11 Mastermind, Leads Eid Prayers In Lahore

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुन्हा ‘दिल्ली टार्गेट’ करू, हाफिज सईदची धमकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी हाफिज सईदने आता राजधानी दिल्लीवर हल्ल्याची धमकी दिली आहे. कराचीमध्ये आयोजित एका जाहीर सभेत त्याने सन 2000 मध्ये लाल किल्ल्यावर केलेल्या हल्ल्यासारख्या मोठ्या हल्ल्याची गरज असल्याचे म्हटले आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर संस्था ‘आयबी’ने शुक्रवारी दिल्ली पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यानंतर राजधानीत तत्काळ बंदोबस्त वाढवण्यात आला.
गुप्तचरांच्या माहितीनुसार ‘जमात-उद-दवा’चा सर्वेसर्वा सईदने शुक्रवारी अक्षरश: गरळ ओकली. तो म्हणतो, ‘जिहाद केवळ इतर प्रदेशांपुरता मर्यादित न ठेवता भारतात तो फैलावला पाहिजे. आजची परिस्थिती पाहता सन 2000 मधील हल्ल्यासारख्या मोठ्या हल्ल्याची गरज निर्माण झाली आहे. तो कोणीही थांबवू शकणार नाही.’ लाहोरमध्ये गद्दाफी स्टेडियमवरही सईदने भडक भाषण दिले. अमेरिकेने त्याच्यावर 10 दशलक्ष डॉलरचे (60 कोटी रुपये) बक्षीस ठेवले आहे.


ट्विटवरही भडकावले : नमाजापूर्वी सईदने ट्विटरवरही भडकावले. तो म्हणतो, ‘काश्मीर, पॅलेस्टाईन आणि ब्रह्मदेशातील लोक दबावाखाली आहेत. त्यांच्यावर अन्याय होत आहे. आता वेळ आली आहे. लवकरच हे लोक स्वातंत्र्याचा झेंडा फडकावून ईद साजरी करतील.’


धमकीमागील
धोका काय?

पूंछमध्ये झालेल्या हल्ल्यापूर्वी दोन दिवस 3 ऑगस्टला हाफिज सईदने पाकिस्तानी हद्दीतील गुरुंड चौकीचा दौरा केला होता. पाक लष्कराच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीमची भेट घेऊन त्याने हल्ल्यासाठी भडकावले होते.
8 जानेवारीला मेंढर सेक्टरमध्ये पाक सैनिकांनी केलेल्या हल्ल्यापूर्वी सईदने दौरा केल्याचे उघडकीस आले. त्या हल्ल्यात भारताचे दोन जवान शहीद झाले होते. यातील एकाचे शिर पाक सैनिकांनी कापून नेले होते.
मुंबईवरील 2008च्या दहशतवादी हल्ल्यातही हाफिज सईदचाच हात होता. भारताने वारंवार पुरावे सोपवूनही तो पाकिस्तानात खुलेआम फिरतो आहे.


पाकची कबुली,
दाऊद पळाला

भारताचा ‘मोस्ट वाँटेड’ गँगस्टर दाऊद इब्राहिम आपल्या देशात होता हे पाकने प्रथमच मान्य केले. मात्र, तो आता परागंदा असून सध्या तो संयुक्त अरब अमिरातीमध्ये असण्याची शक्यता पंतप्रधान नवाज शरीफ यांचे विशेष दूत शहरयार खान यांनी व्यक्त केली. दाऊद पाकमध्ये असेल तर त्याचा माग काढून मुसक्या बांधू, असेही ते म्हणाले. भारताशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने खान यांची विशेष नेमणूक करण्यात आली आहे.