आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Hafiz Saeed Says India Will Have To Withdraw Army From Kashmir

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काश्मिरातून भारताला माघार घ्‍यावीच लागेलः हाफिज सईदने दिली धमकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्‍लामाबाद- मुंबई हल्‍ल्‍याचा प्रमुख सुत्रधार जमात-उद-दावा संघटनेचा म्‍होरक्‍या हाफिज सईदने भारताविरुद्ध पुन्‍हा गरळ ओकली आहे. अमेरिकन सैन्‍याने ज्‍याप्रमाणे अफगाणिस्‍तानातून माघार घ्‍यायला सुरुवात केली आहे, त्‍याचप्रकारे भारतीय लष्‍करावरही काश्मिरातून परतण्‍याची लाजीरवाणी वेळ येईल, असे सईद बडबडला आहे.

सईद एवढ्यावरच थांबला नाही. त्‍याने भारतावर पाकिस्‍तानविरुद्ध युद्धाच्‍या तयारीत असल्‍याचा आरोप केला आहे. ट्विटरवर त्‍याने ट्विट करुन सांगितले, भारत शस्‍त्रास्‍त्र संख्‍येत मोठी वाढ करीत आहे. अफगाणिस्‍तान आणि बलुचिस्‍तानमध्‍ये अमेरिकेच्‍या पराभवानंतर भारताचा खेळ संपला आहे. अफगाणिस्‍तानातून अमेरिका गाशा गुंडाळत आहे, तर जगाला काश्मिरातून भारताची माघार बघायला मिळेल.

संसदेवरील हल्‍ल्‍याचा मास्‍टरमाईंड अफझल गुरुच्‍या फाशीनंतर काश्मिरमधील फुटीरवादी नेता यासिन मलिक आणि हाफिज सईद एकाच व्‍यासपीठावर आले होते. काश्मिरात फुटीरवादी नेत्‍यांना भडकाविण्‍याचे काम सईद करीत असून भारतात मोठ्या दहशतवादी कारवाया करण्‍याची धमकीही सईदने दिली होती.