आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताला दहशतवादी राष्‍ट्र घोषित कराः हाफिझ सईदच्‍या उलट्या बोंबा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचा मोस्‍ट वॉन्‍टेड दहशतवादी हाफिझ सईदने पुन्‍हा भारताविरुद्ध गरळ ओकली आहे. एकीकडे पाकिस्‍तानी सैनिकांनी शुक्रवारी रात्री शस्‍त्रसंधीचे उल्‍लंघन केले. तर, दुसरीकडे सईदने भारतविरोधी रॅली काढून भारताला दहशतवादी राष्‍ट्र घोषित करण्‍याची मागणी करुन उलट्या बोंबा ठोकल्‍या.

जमात-उद-दावाचा म्‍होरक्‍या हाफिझ सईद मुंबईवर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍याचा मास्‍टरमाईंड आहे. भारताने त्‍याच्‍या अटकेची मागणी वारंवार पाकिस्‍तानकडे केली आहे. मात्र, त्‍याला अटक केली नाही. हाफिझ सातत्‍याने भारताविरुद्ध गरळ ओकत असतो. आज (शनिवार) त्‍याने भारतविरोधी रॅली काढली. त्‍यावेळी त्‍याने भाषण ठोकून भारताला दहशतवादी राष्‍ट्र घोषित करण्‍याची मागणी केली. गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदींना त्‍याने मुस्लिमांचे मारेकरी म्‍हटले. दफा-ए-पाकिस्‍तान अर्थात पाकिस्‍तान बचाव नावाने ही रॅली काढण्‍यात आली होती. हजारो पाकिस्‍तानी नागरिक त्‍यात सहभागी झाले होते. भारतविरोधी नारेही या रॅलीत लावण्‍यात आले. काश्मिरचा ताबा मिळवण्‍याची शपथही अनेकांनी घेतली.