आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहेगफिश नावाच्या माशापासून निघणारा हा चिकट पदार्थ लक्षपूर्वक पाहून घ्या. कारण भविष्यात तुम्ही त्यापासून तयार केलेले कपडे घालण्याची शक्यता आहे. हेगफिशपासून काढलेला पदार्थ धाग्यासारख्या फायबरपासून बनलेला असतो. या माशाच्या शरीरातील 100 पेक्षा जास्त ग्रंथींतून हा पदार्थ स्रवतो. कॅनडाच्या ग्यूफ विद्यापीठात या संशोधन प्रकल्पाचे नेतृत्व करणारे डग्लस फज सांगतात की, तुम्ही हे फायबर पाण्यात ताणून धरले आणि नंतर बाहेर काढून ते कोरडे केल्यास त्यात धाग्यासारखी लक्षणे दिसतात. हेगफिश फायबर खूप पातळ आणि मजबूत असते. त्यामुळेच डग्लस आणि त्यांच्या टीमने विचार केला की, या फायबरचा उपयोग कपड्यांसाठी होऊ शकतो.
शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून तेलापासून बनणारे नायलॉन आणि स्पॅनडेक्ससारख्या सिंथेटिक फायबरसाठी दुसरा पर्याय शोधत होते. हेगफिशच्या धाग्यापासून आजवर कुणीही रीळ बनवलेले नाही. मात्र, डग्लस आणि त्यांच्या टीमचे मत आहे की, हेगफिशपासून निघणार्या चिकट पदार्थापासून किंवा अशाच प्रकारच्या दुसर्या प्रथिनाचे रूपांतर पर्यावरणासाठी अनुकूल असलेल्या चांगल्या फॅब्रिकमध्ये करता येऊ शकते. या फॅब्रिकपासून अॅथलीटचे कपडे किंवा बुलेटप्रूफ जॅकेटही बनवले जाऊ शकते. हेगफिशला जबडा आणि पाठीचा कणा नसतो. 50 कोटी वर्षांपूर्वीचा हा मासा समुद्राच्या तळाशी राहतो आणि मृत व्हेल मासे खातो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.