आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हकीमुल्ला अजून जिवंत आहे : तालिबान

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - तहरीक-ए-पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने तालिबानचा म्होरक्या हकीमुल्ला महसूद अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मरण पावल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. हकीमुल्ला अद्याप धडधाकट असून त्याच्या मृत्यूच्या बातम्या या फक्त अफवाच असल्याचे संघटनेने म्हटले आहे. महसूदचा ठावठिकाणा लावण्यासाठी अमेरिकेडून अशा अफवा पसरवल्या जात असल्याचे संघटनेने म्हटले आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांत गुप्तचर अधिकाºयांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात उत्तर वजिरीस्तान भागातील दत्ताखेलमध्ये अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यांत महसूद मारला गेल्याचे म्हटले होते.
तहरीक-ए-पाकिस्तानचा प्रवक्ता अहसानुल्लाने शब्दांची फिरवाफिरव करत हकीमुल्ला महसूद हाही एक मनुष्य असून त्यांना मृत्यू येऊ शकतो. ते मुजाहीद आहेत, त्यांचा जर मृत्यू झालाच असेल तर त्यांना जन्नत मिळेल, असे संदिग्ध वक्तव्य केले. दरम्यान, महसूद खराच मेला असेल, याबाबत पाकिस्तानला खात्री नाही. यामुळे यामागील खरे-खोटेपणाची खात्री करण्यासाठी पाकिस्तानकडून तपास करण्यात येत आहे.