आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hakimullah Was A Wanted Man, Provided Safe Haven For Qaeda: US

हकीमुल्‍ला मसूदला शहीदाचा दर्जा द्या, अमेरिकेसोबत संबंध तोडाः तालिबानची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानसेहरा- अमेरिकेने खैबर पश्‍तून प्रांतात केलेल्‍या ड्रोन हल्‍लयात तालिबानचा प्रमुख हकीमुल्‍ला मसूद मारल्‍या गेला. त्‍याला शहिदाचा दर्जा द्यावा आणि अमेरिकेसोबत संबंध तोडावे, अशी मागणी जमात-ए-इस्‍लामी या दहशतवादी संघटनेने केली आहे.

जमात-ए-इस्‍लामीचा प्रवक्ता मोहम्‍मद इब्राहितने पत्रकारांना सांगितले, की ड्रोन हल्‍ल्यात मारल्‍या गेलेले सर्वजण पाकिस्‍तानात शांतता चर्चेसाठी प्रयत्‍न करत होते. परंतु, त्‍यांना मारण्‍यात आले. अमेरिका पाकिस्‍तानचे हित जाणून न घेता स्‍वतःचे राजकारण रेटत आहे. अशा प्रकारचे ड्रोन हल्‍ले दोन्‍ही देशांमधील संबंध बिघडवत आहेत. खैबर पश्‍तून भागात ड्रोन हल्‍ले रोखण्‍यासाठी आम्‍ही सरकारला सर्वतोपरी मदत करु. पाकिस्‍तानच्‍या सरकारनेही धोरणात सुस्‍पष्‍टता आणली पाहिजे. अमेरिकेचे पाकिस्‍तानातील वर्चस्‍व संपले पाहिजे, असे इब्राहिमने म्‍हटले आहे.

पाकिस्‍तानी तालिबानचा प्रमुख हकीमुल्‍ला मसूद तीन दिवसांपूर्वी ड्रोन हल्‍ल्यात ठार झाला होता. त्‍याच्‍याशिवाय आणखी दोघांचा या हल्‍ल्‍यात मृत्‍यू झाला होता. त्‍यानंतर हकीमुल्‍लाला शनिवारी एका अज्ञात ठिकाणी दफन करण्‍यात आले. अमेरिकेच्‍या मोस्‍ट वॉन्‍टेड दहशतवाद्यांच्‍या यादीत हकीमुल्‍लाचे नाव होते. त्‍याच्‍यावर 5 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस होते.