आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hamas Kills 18 Suspected Israel Informer News In Marathi

इस्रायली हेर असल्याच्या संशयावरुन 18 जणांची खुलेआम कत्तल, बघा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो ओळ- इस्रायली हेर असल्याच्या संशयावरुन हमासच्या दहशतवाद्यांनी तब्बल 18 जणांची खुलेआम कत्तल केली.)
जेरुसलेम (इस्रायल)- इस्रायली लष्कराला महत्त्वपूर्ण माहिती पुरवत असल्याच्या संशयावरुन हमासच्या दहशतवाद्यांनी तब्बल 18 जणांची लोकांसमोर कत्तल केली. इस्रायली लष्कराच्या हल्ल्यात हमासचे तीन वरिष्ठ कमांडर ठार झाले होते. याचा बदला घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे हमासने सांगितले आहे. यानंतर इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात पाच नागरिक ठार झाले.
पॅलेस्टाईनचे माजी पंतप्रधान आणि हमासचे माजी प्रमुख इस्माइल हानिए यांनी सांगितले, की आता आम्हाला काय करायचे आहे हे स्पष्ट झाले आहे. आता आम्ही मागे हटणार नाहीत.
दक्षिण गाझा प्रांतात इस्रायलने केलेल्या मिसाईल हल्ल्यात हमासच्या तीन कमांडरसह सात नागरिक मृत्युमुखी पडले होते. दुसरीकडे कतारमध्ये पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी हमासचे माजी नेते खालेद मेशाल यांची भेट घेतली.
पुढील स्लाईडवर बघा, पॅलेस्टाईनच्या दहशतवाद्यांनी या लोकांनी कशी क्रूरतेने हत्या केली.... यावेळी मोठा जनसमुदाय जमला होता...