(छायाचित्र : राष्ट्राध्यक्ष अब्देल अब्बास, रॉयटर्स )
रामल्लाह - इस्लामिस्ट चळवळीने गाझापट्टीवर सरकार चालवण्यास अडथळा आणल्यास हमासबरोबर करण्यात आलेले ऐक्य करार तोडण्यात येईल, असा इशारा पॅलेस्टिनचे राष्ट्राध्यक्ष महमद अब्बास यांनी दिला आहे. सध्या कैरोमध्ये इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फत्ताह अल-सिसींबरोबर शस्त्रसंधीबाबत बोलणी चालू असताना पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्षांनी हा इशारा दिला.अशीच परिस्थिती आम्ही हमासबरोबर चालू ठेवू शकणार नाही.
इजिप्तच्या राजधानीत आल्यानंतर अब्बास यांनी शनिवारी (ता. सहा) हमासबाबत
आपले मत स्पष्ट केले.जर हिंसक कारवाया गाझावर थांबले नाही तर, मैत्रीचे संबंध पुढे असेच राहणार नाही,असे ते म्हणाले.