आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hamas Political Leader Khaled Meshaal News In Marathi, Divya Marathi

गाझापट्टीवरील युध्‍द अमेरिकेने थांबवावे, हमासच्या राजकीय प्रमुखाची विनंती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - बराक ओबामा यांनी हस्तक्षेप करून इस्रायल सरकार गाझावर चहुबाजूंनी करत असलेली नाकेबंदी उठवावी, अशी विनंती हमासचे राजकीय प्रमुख खालेद मेशाल याने केली आहे. तसेच शस्त्रसंधीची बोलणी करून पॅलेस्टाइनविरूध्‍द चालू असलेले युध्‍द थांबवावे. हमासने अशी विनंती याहू डॉट न्यूज डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत केली. सोमवारपर्यंत (ता. 26) इस्रायलच्या हल्ल्यात एकूण 2 हजार 124 जणांचा बळी गेला आहे.
तुम्ही सर्वात शक्तीशाली राष्‍ट्राचे प्रमुख आहात. मी तुम्हाला विनंती करतोय की, इस्रायलला गाझावरील हल्ला बंद करण्‍याचे सांगा. आणि नाकेबंद उठवून सर्व सीमा खुल्या करून गाझाची पुनर्बांधणी करावी, असे हमास राजकीय प्रमुख खालेद मेशाल यांनी याहु न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. हे आमचे स्वप्न आहे. अशा पध्‍दतीची प्रत्यक्ष विनंती ओबामांना इंग्रजीतून करण्‍यात आली आहे.शनिवारी इस्रायली व‍िमानांनी 12 मजली इमारत उध्‍वस्त केले. यात 22 जण जखमी झाले.

मुलाखतमध्‍ये विचारण्‍यात आलेली सर्व प्रश्‍नांची उत्तरे मेशाल यांनी अरेबिकमध्‍ये दिली. त्याने इस्रायल पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहूची तुलना हिटलरशी केली.
(साभार : news.yahoo.com)