आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रायलचे गाझावर हल्ले पुन्हा झाले सुरू, म्हणे, 'हमासचे रॉकेट हल्ले सुरुच'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - रविवारी सकाळी गाझा शहरातील एका इमारतीतून निघणारा धूर

गाझा/जेरुसेलम - इस्रायलने 12 तासांच्या शस्त्रसंधीनंतर पुन्हा एकदा गाझावर भू, वायू आणि पाणी अशा तिन्ही मार्गांतून हल्ले सुरू केले आहेत. शस्त्रसंधी सुरू ठेवण्यास पॅलेस्टीनींनी नकार दिला आणि रॉकेट हल्ले सुरुच ठेवले, त्यामुळे पुन्हा हल्ला करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे इस्रायली सैन्याच्या वतीने सांगण्यात आले.
इस्रायलने संयुक्त राष्ट्रांची 24 तासांची शस्त्रसंधीची अट मान्य केली होती. पण हमासने तशी तयारी दाखवली नाही. त्यामुळे गाझापट्टीत शनिवारी इस्रायल आणि हमास यांच्यात बारा तासांची शस्त्रसंधी लागू होताच परिसरात शांतता पसरली. पण त्यापूर्वी इस्रायलने गाझाचे चांगलेच नुकसान केले. शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत एकूण 52 जण ठार झाले. शस्त्रसंधी लागू होताच गाझा पट्टीतील लोक घराबाहेर आले. त्यांनी खाद्यान्नासह महत्त्वाच्या सामानाची खरेदी केली.

शस्त्रसंधीच्या पहिल्या सहा तासांमध्ये 100 जणांचे मृतदेह ढिगा-याबाहेर काढण्यात आले. मृतांमध्ये एकाच कुटुंबाच्या 18 जणांचा समावेश आहे. 19 दिवसांच्या या संघर्षामध्ये आतापर्यंत एकूण 1,033 लोक ठार झाले आहेत. या दरम्यान गाझामध्ये मृत्यू झालेल्या सैनिकांची संख्या 40 वर गेली आहे.

चर्चमध्ये प्राथर्न (नमाज) करत आहेत मुस्लीम
गाझामध्ये होणा-या हल्ल्यांमुळे आता त्याठिकाणचे मुस्लीम चर्चमध्ये जाऊन प्रार्थना (नमाज) करत आहेत. तेथील पादरींनी याठिकाणी प्रार्थनेला परवानगी दिल्याचे येथील नागरिकांना सांगितले. येथे सुमारे 500 पॅलिस्टीनी आहेत.

मृत गर्भवतीच्या पोटात जिवंत बाळ
शुक्रवारी गाझावर जालेल्या हल्ल्यात एका 23 वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. तिच्या घरावर रॉकेट हल्ला झाला होता. सुरक्षारक्षकांनी महिलेचा मृतदेह ढिगा-यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केला. तेथे महिलेच्या गर्भातील बाळाला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. त्या बाळावर सध्या उपचार सुरू आहेत.

संघर्षाचे 19 दिवस
1,033 पॅलिस्टीनी नागरिकांचा मृत्यू
40 इस्रायलीचा मृत्यू
1.18 लाख लोक शिबिरांत दाखल
3,209 हल्ले इस्रायलने केले
2,233 रॉकेटहल्ले हमासने केले
4,500 हून अधिक घरे उध्वस्त
59 मशीदींचे नुकसान

पुढील स्लाइड्सवर पाहा गाझा हल्ल्यानंतरचे फोटो...