आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hand Over Lakhvi To India, Britain America Warned Pakistan

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड लख्वीला भारताकडे सोपवा, ब्रिटन-अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर/इस्लामाबाद - मुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंड झकी उर रहमान लख्वीला भारताकडे सोपवण्याचा इशारा अमेरिका आणि ब्रिटनने पाकला दिला आहे. भारतात लख्वीवर स्वतंत्र खटला चालवता येईल, यामुळे भारत-पाकदरम्यानचे संबंधही सुधारतील, असे दोन्ही देशांनी म्हटले आहे.

सोमवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयातील सरकारी वकिलांनी लख्वी प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान ही माहिती दिली. न्यायालयाने दोन्ही देशांची नावे स्पष्ट केली नव्हती, मात्र नंतर गृहमंत्रालयाकडून पत्रकारांसमोर ती उघड करण्यात आली. सरकारी वकिलांना उत्तर देताना हायकोर्टाचे जज शौकत अजिज सिद्दिकी म्हणाले, ‘सरकारला घाई असल्यास हे प्रकरण लष्करी न्यायालयात वर्ग करावे. तसेही लख्वीला दुस-या देशाकडे सुपूर्द करणे हा धोरणात्मक मुद्दा आहे. यावर सरकारला विचार करायचा आहे. कोर्टाचे या प्रकरणाशी फार देणे-घेणे नाही.’

२६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या मुंबई हल्ल्याचा कट रचणे तसेच हल्लेखोरांना प्रशिक्षण आणि मदत करण्याचा आरोप लख्वीवर आहे. या हल्ल्यात अमेरिकन नागरिकांसह १६६ जणांचा बळी गेला होता. डिसेंबर २००८ मध्ये लख्वीला अटक झाली होती.

पुढे वाचा प्रकरण काय आहे ?