आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढत्या वयाबरोबर कमी होऊ शकते मुलांचे अपंगत्व

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटिझमवरील (स्वमग्नता) उपचारांचे विविध प्रकार आणि पद्धती आहेत. यातील काही उपयुक्त आहेत तर काही निष्फळ ठरतात. परंतु, एका साध्या पद्धतीकडे लोकांचे फारसे लक्ष नाही. ही पद्धत म्हणजे वाट पाहणे. बाल मानसोपचार आणि मनोरोगतज्ज्ञ जर्नल्समध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार काही मुलांमध्ये ऑटिझमची तक्रार वय वाढल्यावर संपुष्टात येते. ऑटिझमने ग्रासलेल्या मुलांना बोलण्यात आणि समजून घेण्यात अडचण येते. व्यक्तिमत्त्वाशी निगडित सर्व दहा आजारांचा परिणाम वय वाढेल तसा कमी होत जातो. याची दोन मुख्य कारणे आहेत. रुग्णाला आजारासोबत जगणे शिकतो. 20 वर्षांपर्यंत मेंदू विकसित झाल्यानेही अवस्था सुधारते.

ऑटिझमग्रस्त मुले बरी होण्याच्या शक्यतेचे आतापर्यंत अनेक चिन्हे दिसून आली आहेत; परंतु यापूर्वी करण्यात आलेल्या संशोधनात नियमित प्रश्न उपस्थित केला जात असे की, जी मुले ऑटिझमपासून मुक्त झाल्याचे सांगितले जाते, ती खरोखरच आजारी होती का? नवीन संशोधनानुसार कनेक्टिकट विद्यापीठाचे मानसशास्त्रज्ञ डेबोराह फीन यांनी 8 ते 21 वर्षे वयाच्या 34 व्यक्तींचे अध्ययन केले. या व्यक्ती ऑटिझमने ग्रासल्या होत्या; परंतु नंतर ब-या झाल्या. यांची तुलना याच वयाच्या 44 रुग्णांशी केली गेली. त्यांच्यात आजाराची लक्षणे कायम आहेत. दोन्ही समूहातील व्यक्तींवर एकसारखेच उपचार केले गेले. ज्या व्यक्ती ब-या झाल्या, त्यांची अवस्था वाढत्या वयोमानानुसार सुधारली. मात्र, इतर रुग्णांचे असे होऊ शकले नाही, असे या संशोधनात दिसून आले.

‘ऑटिझम स्पीक’ संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ जेराल्डिन डॉसन यांच्या मते, हे एक ऐतिहासिक संशोधन आहे. इतर लोक त्याच्याशी असहमत आहेत. त्यांच्या मते, काही मुलांनी आपल्या आजारांची लक्षणे लपवली असल्याची शक्यता आहे. त्यांनी निरोगी व्यक्तींप्रमाणे वर्तन केले असेल.