आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करान्यूयॉर्क/लंडन - अफजल गुरूला फासावर लटकावल्याच्या घटनेवर जागतिक मानवी संघटनांनी गळा काढायला सुरुवात केली आहे. फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी मानवी हक्क संघटनांकडून करण्यात आली आहे.
भारताने अफजल गुरूला आता फाशी का दिली, असा सवाल निर्माण होतो, असे न्यूयॉर्क येथील मानवी हक्क संघटनेच्या दक्षिण आशियाच्या मीनाक्षी गांगुली यांनी म्हटले आहे. गंभीर गुन्ह्यात हात असलेल्या लोकांना शिक्षा करू नका, असे कोणीही म्हणणार नाही, परंतु मृत्युदंड ही अत्यंत क्रूर घटना आहे. ही शिक्षा दिल्यानंतर त्याला मागे घेता येत नाही. कोणत्याही परिस्थितीत मृत्युदंड देणे आम्हाला चुकीचे वाटते. आम्ही त्याचा निषेध करतो. विरोध करतो. गुरूला फाशी देणे ही लज्जास्पद घटना आहे. आम्ही त्याचा निषेध करतो असे अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया संघटनेचे संचालक शशिकुमार वेलाथ यांनी म्हटले आहे. मृत्युदंडाची अमानुष शिक्षा तातडीने थांबवली पाहिजे. केवळ काही लोकांना वाटते म्हणून हा मार्ग निवडणे योग्य होणार नाही. भारताने जनमताला सुखावण्यासाठी फाशी देऊ नये, अशी मागणीही अमेरिकेतील मानवी हक्क संघटनेने केली आहे.
चर्चेवर परिणाम : मिरवाइज
अफजल गुरूला दिलेल्या फाशीचा परिणाम सरकार आणि काश्मीर फुटीरतावादी गट यांच्यातील संभाव्य चर्चेवर होऊ शकतो. फाशीनंतर भारतासोबतच्या चर्चेची शक्यता धूसर झाली आहे, असे फुटीरतावादी नेते मिरवाइज उमर फारूक यांनी म्हटले आहे. या निर्णयामुळे तरुणांमध्ये द्वेषाची भावना वाढीस लागेल, असे मिरवाइजने म्हटल्याचे बीबीसीच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
घोडे का अडले?
सुरक्षेच्या मुद्द्यावर गृहखात्याने पीडीजीच्या आराखड्यास मंजुरी दिली, परंतु अद्याप त्यावर अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. त्यामध्ये आर्थिक आणि इतर समस्या आहेत. अर्थ मंत्रालयाकडून आराखड्याला मंजुरी बाकी आहे.
कसे असे स्वरूप?
ग्लॉक पिस्तूल, दूरचे लक्ष्य अचूकपणे भेदणारी स्नीपर रायफल, बुलेटप्रूफ वाहने, इस्रायली गन अशी शस्त्रास्त्रे असलेल्या पीडीजी पथकाला बळकट करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. संसद सुरक्षेचे अतिरिक्त सचिव यांचे या दलावर नियंत्रण असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.