आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपी बर्थ डे टू यू. हनाको ! बुजुर्ग हत्तिणीचे सेलिब्रेशन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो - जपानमधील इनोकाशिरा प्राणिसंग्रहालय रविवारी पाहुण्यांनी गजबजून गेले होते. 800 माणसांनी ‘हॅपी बर्थ डे टू यू .! लाँग लिव्ह.हनाको,’ असे म्हणत वाढदिवसाचा आनंद लुटला. हा वाढदिवस चर्चेचा विषय ठरला. वाढदिवस कोणा माणसाचा नव्हे, तर हत्तिणीचा होता. टोकियोच्या पश्चिम सीमेवरील या संग्रहालयात हनाको नावाची हत्तीण आहे. ती जगातील बुजुर्ग हत्तींपैकी एक. तिचा क्रमांक तिसरा लागतो. तिने वयाची 66 वर्षे पूर्ण केली आहेत. म्हणूनच मुक्या प्राण्याच्या जन्माचे सेलिब्रेशन आगळेवेगळे ठरले. त्यात शेकडो माणसांनी सहभागी होऊन आनंद लुटला. हनाकोचा जन्म थायलंडमध्ये (बँकॉक) 1949 मध्ये झाला. वयाच्या दुसर्‍या वर्षी तिला जपानला आणण्यात आले. तिच्या जन्माची नेमकी तारीख माहीत नसली तरी तिच्या जन्माचे वर्ष लक्षात घेऊन दरवर्षी 1 जानेवारीला तिचे वय मोजले जाते.
(छायाचित्र: संग्रहित)