आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेने हक्कानी बंधूंवर 3 कोटी डॉलरचे इनाम केले जाहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेने पाकिस्तानातील हक्कानी दहशतवादी नेटवर्कच्या सदस्यांवर मोठे इनाम जाहीर केले आहे. या संघटनेच्या नेत्यांना पकडण्यासाठी मदत करणाऱ्याला तीन कोटी डॉलर अर्थात १.८२ अब्ज रुपये दिले जाणार आहेत. अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने घोषित केलेल्या या नेटवर्कमधील सर्व नेते परस्परांचे नातेवाईक आहेत. यात अजीज हक्कानी, खलील अल-रहमान हक्कानी, याह्या हक्कानी आणि अब्दुल रऊफ जाकीर या पाच जणांचा समावेश आहे. यापैकी प्रत्येकावर ५० लाख डॉलरचे (सुमारे ३० कोटी रुपये) बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या नेटवर्कचा म्होरक्या सिराजुद्दीन याची माहिती देणाऱ्याला कोटी डॉलर अर्थात सुमारे ६१ कोटी रुपये मिळतील. हक्कानी नेटवर्कचा संस्थापक जलालुद्दीन याचा तो मुलगा आहे.

अफगाणिस्तानात अमेरिकन आणि नाटो सैन्यावर हल्ले करण्याचा आरोप हक्कानी नेटवर्कच्या सदस्यांवर आहे. २००८ मध्ये या संघटनेने काबूलमधील सेरेना हॉटेलवर हल्ला केला होता. यात एका अमेरिकन नागरिकासह सहा जणांचा मृत्यू झाला होता. २०११ मध्ये काबूलमधील अमेरिकन दूतावासाला १९ तास ओलीस धरले होते. हक्कानीने अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावरही हल्ले केले होते. काबूलमध्ये भारतीय दूतावासावर २००८ आणि २००९ मध्ये हल्ले केले होते. यात ७५ जणांचा मृत्यू झाला होता.
विदेशी नागरिक, अधिकाऱ्यांना लक्ष्य करून हक्कानी गट त्यांच्यावर सातत्याने हल्ले करत आहे. त्यात अनेक अमेरिकन नागरिक जखमी झाले आहेत.