आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Harbin Festival Started At China , News In Marathi

चीनमध्ये बर्फाच्या कलाकृतींचा हर्बिन उत्सव सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - रंगीबेरंगी बर्फाच्या कलाकृतींनी सजलेला ३१ व्या हर्बिन आंतरराष्ट्रीय आइस अँड स्नो फेस्टिव्हल सोमवारी सुरू झाला. उत्तर चीनच्या हेलांगजियांग राज्यातील हर्बिनमध्ये आयोजित हा उत्सव पाहण्यासाठी देश-विदेशातून दरवर्षी लाखो पर्यटक इथे येतात.
या वर्षी हर्बिन फेस्टिव्हलची थीम हॅपी आइस स्नो, एक्सायटिंग सिटी आहे. उत्सव २८ फेब्रुवारीपर्यंत चालेल. या वेळचे मुख्य आकर्षण चिनी संस्कृतीवर आधारित कलाकृतींचे आहे. यामध्ये आइस ट्रेन, बर्फाचा भूलभुलैया आणि इमारती आहेत. उत्सवासाठी सोंगुया नदीत जमा झालेल्या बर्फाचा वापर केला जातो. त्याआधी २०१२ आणि २०१३ मध्ये हर्बिन उत्सव पाहण्यासाठी २.८५ लाख पर्यटक आले होते.
२००० पेक्षा जास्त कलाकृती
१५० अमेरिकी कलाकारांचा सहभाग
-३१ अंश येथील तापमान आहे