न्यूयॉर्क - अमेरिकेच्या एका न्यायालयाने व्यावसायिक हेरॉल्ड हॅम यांना घटस्फोटानंतर पत्नीला 6 हजार 154 कोटी रुपये देण्याचा आदेश दिला आहे. हा अमेरिकेतील सर्वात महागडा घटस्फोट ठरला आहे. ओक्लाहामा काऊंटी न्यायालयात घटस्फोटाची 10 आठवडे सुनावणी चालली. न्यायाधीशांनी सर्वाधिक श्रीमंत असलेल्या 69 वर्षी हॅम यांना 6 हजार 154 कोटी रुपये घटस्फोटीत पत्नीला देण्याचे आदेश दिले. यापैकी निम्मी रक्कम या वर्षाच्या शेवटी आणि नंतरची रक्कम हप्त्याने देण्याचे न्यायालयाने सांगितले आहे. हॅरॉल्ड हॅम आणि सुई एन हॅमचे 1988 मध्ये विवाह झाला होता. त्यांना दोन मुली आहेत.
कोण आहेत हेरॉल्ड हॅम ?
अमेरिकेच्या ओक्लाहामा प्रांतात हेरॉल्ड हॅम यांचा जन्म झाला. त्यांनी 'कॉन्टिनेन्टल रिसोर्सेस इंक' या तेल कंपनीची 1967 साली सुरुवात केली. त्यांच्याकडे कंपनीचे 68 टक्के समभाग आहेत.