आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॅरी पॉटरला अदृश्य करणारा अंगरखा प्रत्यक्षात अवतरणार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - हॅरी पॉटर चित्रपटात वापरण्यात आलेला अदृश्य करणारा अंगरखा प्रत्यक्षात तयार करण्याचे तंत्र शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. ठरावीक प्रकाशलहरींमध्ये एखादी वस्तू अदृश्य करण्याची पद्धत शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे. टेक्सास विद्यापीठातील संशोधकांनी हा शोध लावला आहे. संशोधकांनी एक अशा प्रकारचा पातळ पदार्थ तयार केला आहे, जो एखाद्या वस्तूवर आच्छादला गेल्यास ती वस्तू गायब होते. मात्र, हा प्रयोग केवळ मर्यादित प्रकाशलहरींवर, विशेषत: अतिसूक्ष्म लहरींवर यशस्वी होऊ शकतो.

शास्त्रज्ञांनी एक फूट लांब आणि इंचभर व्यासाच्या सिलिंडरभोवती हा पदार्थ लावला असता मायक्रोवेव्ह डिटेक्टरला ते स्पष्टपणे दिसले नाही, मात्र साध्या मानवी डोळ्यांना दिसू शकले. त्यामुळे सूक्ष्म प्रकाशलहरींएवढ्या प्रकाशात असा प्रयोग केल्यास मानवी डोळ्यांसमोरून अदृश्य होईल. जो पदार्थ अदृश्य करायचा आहे, त्या पदार्थातील कण केसांपेक्षा पातळ असणे आवश्यक आहे. साधा आणि सहज इतरत्र नेण्याजोग्या पदार्थापासून हा अंगरखा तयार करण्यात आला असून तो पदार्थ इतर कोणत्याही पृष्ठभागावर प्रयोगात आणला जाऊ शकतो. मात्र, प्रकाश म्हणजे तरंग असून ती थांबवता येऊ शकते. याच तत्त्वानुसार हा अंगरखा तयार केला आहे. सध्या तरी हा प्रयोग ठरावीक मर्यादेत एखादी वस्तू डोळ्यांसमोरून अदृश्य करण्याकरिता यशस्वी झाला आहे. मात्र, अत्याधुनिक पद्धतीने एखादी वस्तू संपूर्णपणे अदृश्य करता येईल, अशी आशा शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.


डीव्हीडीतील पदार्थांचा वापर
सीडी किंवा डीव्हीडीमध्ये वापरण्यात येणारे मिश्रण म्हणजेच तांब्याची पट्टी आणि पॉलिकार्बोनेटच्या मिश्रणातून हा पदार्थ तयार करण्यात आला आहे. या पदार्थापासून बनलेल्या अंगरख्यावर आलेल्या सूक्ष्म प्रकाशलहरी तेथेच नष्ट होतात आणि त्यामागील वस्तू गायब होते. एखादी वस्तू अदृश्य करण्यासाठी यापूर्वी त्या वस्तूभोवती प्रचंड प्रकाशझोतांचा वापर करण्यात येत असे. त्यामुळे ती वस्तू नाहीशी झाल्याचा भास होतो.