आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘हर्शेल’ला अलविदा!,हेलियम संपल्यामुळे बंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबोर्न - दूरवर अंतराळात घिरट्या घालत असलेल्या हर्शेल वेधशाळेचे कामकाज सोमवारी बंद करून ब्रह्मांडाच्या अंतरंगात डोकावणा-या या वेधशाळेला अलविदा करण्यात आले आहे. एक अब्ज युरो खर्च करून तयार करण्यात आलेली ही वेधशाळा पृथ्वीपासून 21.4 लाख किलोमीटर अंतरावर सूर्याच्या सभोवताली हळूहळू घिरट्या घालत आहे.


अनेक अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असलेली हर्शेल वेधशाळा अंतराळात स्थापित करण्यात आलेली अशा प्रकारची पहिलीच शक्तिशाली वेधशाळा असून ती 2009 मध्ये प्रक्षेपित करण्यात आली होती.
चार वर्षांच्या सेवाकाळात या वेधशाळेने अनेक छायाचित्रे आणि आकडेवारी पाठवली. त्यामुळे ता-यांची उत्पत्ती आणि आकाशगंगेचा विकास समजून घेण्यास महत्त्वाची मदत मिळाली आहे.


जर्मनीतील डार्मस्टेड येथील युरोपीय अंतराळ संचालन केंद्राने सोमवारी दुपारी सव्वाबारा वाजता या वेधशाळेचा संवाद ट्रान्सपाँडर बंद करण्यासाठी शेवटचा संदेश पाठवला. सहा सेकंदांनंतर हा रेडिओ संदेश हर्शेलपर्यंत पोहोचला. त्यानंतरच्या सहा सेकंदांनी तिचा पृथ्वीशी संपर्क तुटला. हर्शेलने तिच्या अंतिम हेलियम कुलंटचा वापर केल्यामुळे तिला सेवामुक्त करणे आवश्यक बनले होते. हेलियम संपल्यामुळे हर्शेल दृष्टिहीन झाली होती.