आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापुराने उडवली युरोपची दाणादाण!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिएन्ना- मध्य युरोपात झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडवला आहे. या मुसळधार पावसामुळे आलेला महापूर आणि दरडी कोसळून किमान चार जण ठार, तर आठ जण बेपत्ता झाले आहेत. शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि झेक प्रजासत्ताकाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्करी तुकड्या तैनात केल्या आहेत. अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेल्यामुळे मदत आणि बचावकार्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

डेन्यूब नदीचा रुद्रावतार
दक्षिण जर्मनीमध्ये इन आणि डेन्यूब नदीने रुद्रावतार धारण केल्याने पस्साऊ या जुन्या शहराला महापुराने वेढा घातला आहे. या नद्यांची पाणीपातळी आणखी 11 मीटरने वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

भरपावसातही विजयोत्सव!
डेन्यूब आणि इन नदीला आलेल्या महापुराने धांदल उडालेली असतानाच सुमारे 10 हजार बव्हेरियन-म्युनिचमधील फुटबॉलप्रेमींनी युरोपियन लीग आणि कप तिसर्‍यांदा जिंकल्याचा आनंदोत्सव साजरा केला.
2002 मध्ये युरोपात असाच महापूर येऊन 7.5 अब्ज युरोचे नुकसान झाले होते. यंदाही तशाच महापुराची पुनरावृत्ती होण्याचा धोका स्थानिक अधिकारी व्यक्त करत आहेत.