आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पा‍किस्तानला पावसाचा तडाखा; 19 ठार, 42 जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानला शनिवारी पावसाचा तडाखा बसला असून त्यात किमान 19 जण ठार, तर 42 जणांना दुखापत झाल्याचे वृत्त आहे. खैबर पख्तुनख्वा, गिलगिट-बाल्टिस्तान या प्रदेशाची त्यात अधिक हानी झाली आहे. पाकव्याप्त काश्मीर भागातही मुसळधार पाऊस झाला. पख्तुनख्वामध्ये पावसामुळे घडलेल्या घटनांत 13, तर पंजाबमध्ये 6 नागरिकांचा मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे उत्तरेकडील अनेक घरांची पडझड झाली आहे. बामबोरेट खोºयातील 45 घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार आहे. पावसामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. वारसाक धरणातील सुमारे 50 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. पख्तुनख्वामधील सात जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. त्यात नवशेरा, स्वात, पेशावर, कोहिस्तान या भागात पाणीच पाणी झाले आहे. बाग भागात पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने चार जणांचा मृत्यू झाला.