आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Haz Priligrimage Number Decrease Due To Rupee Falling

रुपयाच्या घसरणींने हज यात्रेकरूंच्या संख्येत घट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - रुपयाच्या दिवसेंदिवस होणा-या घसरणीचा परिणाम भारतातील हज यात्रेकरूंच्या संख्येवरही झाला आहे. रुपयाच्या अवमूल्यनामुळे यात्रेतील खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्रीय हज समितीने जाहीर केलेल्या यादीतील अनेक भाविकांनी आपली नावे मागे घेतल्याचे दुबईच्या एका दैनिकाने म्हटले आहे.
हज यात्रेला मुस्लिम भाविकांमध्ये सर्वोच्च स्थान आहे. मुस्लिम भाविक अनेक वर्ष पैसा-पैसा जोडून ही यात्रा करण्यासाठी प्रयत्न करत असतात. पण यंदा मात्र जागतिक बाजारपेठेत रुपयाचे अवमूल्यन झाल्याने अनेक भाविकांची हज यात्रेची संधी हुकणार आहे. एकट्या आंध्र प्रदेशातून सुमारे 400 हून अधिक भाविकांनी या कारणामुळे यात्रेच्या यादीतून नावे मागे घेतली आहेत. यावर्षी एकूण 1 लाख 36 हजार 20 भाविकांनी हज यात्रा करण्याचे नियोजन केले होते. त्यापैकी 1 लाख 23 हजार 511 केंद्रीय हज समितीतर्फे तर उर्वरित 34 हजार खासगी कंपन्यांतर्फे यात्रा करणार होते.


खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ
भारतीय भाविकांना अझिझिया या स्वस्त आणि ग्रीन ही महाग अशा दोन श्रेणीतून यात्रा करता येते. त्यापैकी ग्रीन श्रेणीला यावर्षी 1 लाख 79 हजार 800 रुपये खर्च येणार आहे. गेल्या वर्षी हाच खर्च 1 लाख 64 हजार 905 होता. म्हणजे या श्रेणीच्या यात्रा खर्चात जवळपास 15 हजारांची वाढ झाली आहे. तर अझिझिया श्रेणीतील यात्रेता खर्चही सुमारे 13 हजारांनी वाढला आहे. गेल्या वर्षीच्या 1 लाख 36 हजार 264 हून यंदा हा खर्च जवळपास दीड लाखावर गेला आहे.