आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पासपोर्टची प्रतीक्षा करीत अखेर त्याने प्राण सोडले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


दुबई । एक 56 वर्षीय भारतीय स्वत:चे राष्ट्रीयत्व सांगण्याचा वारंवार प्रयत्न करतो. परंतु त्याच्याजवळील पुरावा ग्राह्य धरला जात नाही. अशी तीस वर्षे निघून जातात. तो पासपोर्टची वाट बघतो. अखेर त्याला पुरावा मिळतो. परंतु त्याच्या एक तासानंतर त्याचा मृत्यू होतो..!

चित्रपटाची कहाणी वाटावी अशी ही शोकांतिका ओमानमधील भारतीय नागरिकाच्या वाट्याला आली. मधुसूदन असे या नागरिकाचे नाव आहे. ते केरळातून 1977 मध्ये रोजगारासाठी मस्कतला गेले होते. त्या वेळी ते पासपोर्ट आणि इतर कागदपत्रांसह तेथे गेले होते. परंतु तेथे पोहोचताच त्यांची ही महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेली. तेथूनच त्यांच्या दुर्दैवाचा फेरा सुरू झाला. त्यांनी मस्कतमधील अधिका-यांना भारतीय असल्याचे वारंवार सांगितले. केरळमधील प्रशासनाकडूनही मदत घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यांच्याकडे एनसीसीचे प्रमाणपत्र आणि रेशन कार्ड होते. परंतु ते प्रशासनाने अमान्य केले होते.