आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनिमूनहून परतताना पेट्रोल पंपावर ' तो' बायकोच विसरला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्लिन - पत्नीसह हनिमूनहून परतणारा एक र्जमन नवरा पेट्रोल पंपावर बायकोलाच विसरल्याचा अजब प्रकार नुकताच घडला. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर पुन्हा त्या दोघांची भेट झाली.

र्जमन येथील एक नवविवाहित दांपत्य कारने हनिमूनहून परतत होते. नवरी मागच्या सीटवर झोपलेली होती. हायवेवर नवर्‍याने एका पेट्रोल पंपावर गाडी थांबवली. गाडीत पेट्रोल भरून तो थेट निघाला. अनेक तासांच्या प्रवासानंतर त्याने मागे पाहिले. तेव्हा मात्र त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण त्या वेळी त्याची बायको तेथे नव्हती. गोंधळलेल्या अवस्थेत तो पोलिसांकडे गेला. पोलिसांच्या मदतीने त्याने खूप शोधाशोधही केली. तेव्हा त्याची बायको पेट्रोल पंपावर आढळली. पेट्रोल पंपावर जेव्हा गाडी थांबली तेव्हा नवरी मागच्या सीटवरून उतरून स्वच्छतागृहात गेली होती. पण तिच्या नवर्‍याने काहीही न पाहता थेट गाडी काढली व सगळा गोंधळ उडाला.