टोकियो - जपानमधील याशुशी ताकाहाशी याने त्याच्या मैत्रिणीपुढे लग्नाचा प्रस्ताव अतिशय अनोख्या पद्धतीने ठेवला. त्याने नोकरीचा त्याग करत एकट्याने जपान दौरा केला. याशुशीने
आपल्या यात्रेदरम्यान जीपीएस ट्रॅकर अॅक्टिव्हेट केला होता. प्रवास संपल्यावर पाहिल्यानंतर जीपीएस ट्रॅकरवर "मॅरी मी' असा संदेश तयार झाला. याशुशीने ७१६४ किलोमीटरच्या प्रवासातून अनोखा संदेश दिल्याबद्दल त्याचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले आहे.