आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Health News : Good Sleeping Overcome Protestant Cancer

आरोग्य वार्ता: चांगली झोप प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - पुरेशी झोप पुरुषांमध्ये प्रोस्टेट (पुरुष ग्रंथी) कॅन्सरचा धोका कमी करू शकते, असा दावा करण्यात आला आहे. शरीरात झोपेशी संबंधित मेलाटोनिन घटकाची पातळी चांगली असेल तर प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका पुरेशी झोप न मिळणा-या पुरुषांपेक्षा 75 टक्क्यांनी कमी होतो, असे संशोधकांना आढळून आले आहे.
रात्रीच्या वेळी झोपेत असताना मेलाटोनिन स्राव तयार होतो. शरीरातील मेलाटोनिनचे प्रमाण कमी झाल्यास त्याचा झोपेवर परिणाम होतो. शरीरारात मेलाटोनिनच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्यास कॅन्सरची जोखीम वाढू शकते, असे बोस्टनच्या हार्वर्ड स्कूल ऑफ इपीडिमिलॉजी विभागातील संशोधक सराह सी.मार्ट यांनी सांगितले. ज्या पुरुषांच्या शरीरात 75 टक्के मेलाटोनिनचे प्रमाण आढळून आले, त्यांना इतरांच्या तुलनेत प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका कमी असतो, असे संशोधनात दिसून आले.
प्रयोगात सहभागी होणा-या पुरुषांची सकाळी लघवी घेण्यात आली आणि त्यांना रात्रीच्या झोपेबाबत प्रश्न विचारण्यात आले. सातपैकी एकाला झोपेची समस्या होती तसेच तीनपैकी एक जण झोपेसाठी औषध घेत असल्याचे दिसून आले. सहभागी पुरुषांच्या प्रति मिलिलिटर युरिनमागे सरासरी 17.14 नॅनोग्रॅम 6- सल्फाटोक्झी मेलाटोनिन आढळले. ज्या पुरुषांना झोपेची समस्या होती किंवा त्यासाठी औषधे घेणा-या पुरुषांमध्ये 6- सल्फाटोक्झी मेलाटोनिनची पातळी कमी आढळून आल्याचे मार्ट यांनी सांगितले.
928 पुरुषांवर अभ्यास
मेलाटोनिनच्या पातळीत बदल करता येऊ शकतात. कॅन्सरचा धोका आणि मेलाटोनिन स्रावाबाबत आणखी अभ्यास करण्याची आवश्यकता मार्ट यांनी व्यक्त केली. मार्ट आणि त्यांच्या सहका-यांनी 2002 ते 2009 या कालावधीत 928 पुरुषांवर याचा अभ्यास केला. यामध्ये मेलाटोनिन निर्मितीशी संबंधित युरिन पातळी, 6- सल्फाटोक्झी मेलाटोनिन आणि कॅन्सरची जोखीम तपासण्यात आली.