आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐकावे ते नवलच: हॉस्पीटलने बँडेज करण्याचे बिल दिले पाच लाख रुपये!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉस्पिटलकडून मामुली इलाज केला गेल्यास अवाच्या सव्वा बिल आकारले जाण्याच्या घटना आपण नेहमी वाचतो, परंतु अन्य देशांतही अशा घटना घडत आहेत. नुकतेच न्यूजर्सीमध्ये बायोने शहरात अशीच एक घटना घडली. तेथील एका हॉस्पिटलने एका माणसाच्या बोटाला बँडेज केल्यानंतर 5 लाखाचे बिल दिले.
बायर हनुस्ज राजकोवस्कीच्या हाताचे मधले बोट गेल्या वर्षात झालेल्या अपघातात तुटले होते. काही दिवसांपूर्वी त्यावर बँडेज बांधण्यासाठी ते रुग्णालयात गेले. तेथे टिटॅनसचे इंजेक्शन घेतले. तेथे त्यांना 8200 डॉलर( सुमारे पाच लाख 200 रुपये) इतके बिल देण्यात आले. यात 180 डॉलरचे टिटॅनसचे इंजेक्शन, 242 डॉलरचे स्टरिल सप्लाय, 8 डॉलरचे अ‍ॅन्टिबॅक्टिरेयिल ऑर्इंटमेंट आणि इतर नर्सने दिलेल्या सेवेचा दर आकारण्यात आला होता. बिल पाहूनच बायर यांना साहजिकच धक्का बसला. मेडिकल सेंटरने या बिलासाठी त्यांच्या युनायटेड हेल्थकेअर या मेडिक्लेम कंपनीला जबाबदार ठरवले. कारण कंपनीच्या पॉलिसीत इतक्या छोट्या इलाजासाठी भरपाई देण्यात येत नाही. मेडिक्लेम कंपनीने 6640 डॉलर बिल दिले. (जवळपास 4 लाख 5 हजार रुपये) बाकीची रक्कम ब्रायरला द्यावी लागणार असल्याचे कंपनीचे म्हणणे होते. तेव्हा एनबीसी न्यूजने या बाबीची सत्यता पडताळून पाहिली. त्यानंतर मेडिकल सेंटरचे सीईओ डॉ. मार्क स्पेक्टरने बिलाची उर्वरित रक्कम माफ केली.
nbcnewyork.com