आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Healthy Quality Increases In Tulshi, Indian Origine Scientist Lead

आरोग्यवर्धक तुळशीतील अमृत वाढवण्याचा प्रयत्न,भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाकडे नेतृत्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - भारतीय संस्कृतीत तुळशीचे महत्त्व सर्वर्शुत आहे. तुळशीचे हे आनुवंशिक औषधी गुणधर्म वाढवून त्याचा लाभ विविध उपचारपद्धंतीत व्हावा यासाठी भारतीय वंशाच्या एका शास्त्रज्ञाने संशोधन सुरू केले आहे.वेस्टर्न केंटुकी विद्यापीठातील प्लँट मॉलेक्युलार बायोलॉजीचे असिस्टंट प्रोफेसर चंद्रकांत इमानी यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांचे पथक व विद्यार्थ्यांनी हे आव्हान स्वीकारले आहे.
तुळशीची पाने वाटून घेतली तर त्यातून विशिष्ट गंध असलेला रस बाहेर पडतो. तेच युजेनॉल होय. ही वाटलेली पाने एखाद्या गाठीवर पक्की बांधून ठेवली तर त्या पेशीची होणारी अनैसर्गिक वाढ थांबते. प्राचीन काळापासून हा उपचार केला जातो. नव्या प्रयोगातील संकल्पनेचा तोच प्रमुख आधार मानला असल्याचे इमानी म्हणाले.
तुळशीची जेवढी पाने किंवा मंजुळा खुडल्या जातात तेवढय़ा अधिक प्रमाणात या गुणकारी रोपट्यात युजेनॉलची निर्मिती वाढते, असेही प्रयोगातून सिद्ध झाले असल्याचे इमानी यांनी म्हटले आहे. इतर वृक्ष आणि रोपांप्रमाणे तुळशीच्या पानांतही अनेक अनावश्यक संयुगे असतात. मात्र, युजेनॉल निर्मितीची क्षमता या रोपात प्रचंड असल्याचे इमानी यांचे मत आहे.
पूर्वेकडील देशांत तुळशीचा वापर थेट उपचारांसाठी केला जात नसला तरी अनेक उपचारांत सहसंयुग म्हणून तुळशीच्या रसाचा प्रभावी वापर केला जात असल्याचे निरीक्षण इमानी यांनी नोंदवले.
कॅन्सरवरील उपचाराचा उद्देश?
कॅन्सरवर उपचारांसाठी आज अनेक प्रकारच्या औषधी आणि उपचार उपलब्ध आहेत. मात्र, प्राचीन काळापासून आरोग्यवर्धक ठरलेल्या तुळशीतील युजेनॉल या संयुगाचा कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर उपचारांसाठी प्रभावी वापर करणे, हा या संशोधनाचा उद्देश आहे.
गुणकारी युजेनॉल
तुळशीमध्ये युजेनॉल हे गुणकारी संयुग असते. हे संयुग तुळशीमध्ये अधिक प्रमाणात निर्माण व्हावे यासाठी इमानी व त्यांचे सहकारी प्रयत्नरत आहेत. युजेनॉल हे संयुग स्तनाच्या कॅन्सरवर नियंत्रण मिळवण्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते.