आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Its Beauty: हृदयाच्या आकारातील बेट १० लाख डॉलरमध्ये विक्रीला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यू इयरनिमित्त काही लोक प्रिय व्यक्तीला दागदागिने, कपडे, परफ्यूम किंवा एखादी वस्तू भेट देतात; परंतु हे उत्सव तुम्ही खरोखरच अविस्मरणीय बनवू इच्छित असाल तर छायाचित्रातील हे बेट तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. कॅनडातील क्युबेक प्रांतात लॉरिएंटिनी डोंगरांमध्ये मॉन्ट्रियालपासून ४५ मिनिटांच्या अंतरावर ब्ल्यूबेरी बेट हृदयाच्या आकारात विकसित करण्यात आले आहे.
या बेटाची किंमत १० लाख डॉलर इतकी गृहीत धरण्यात आली आहे. अडीच एकरमध्ये हे बेट असून त्यावर देवदार व्हाइट पाइनची झाडे लावण्यात आली आहेत. या बेटावर एक छोटेखानी घर (केबिन) असून तेथे हौशी लोकांसाठी इंटरनेट, सॅटेलाइट डिश आदी सुविधा उपलब्ध आहेत.
पुढे पाहा हृदयाच्या आकारातील बेटाची छायाचित्रे...