आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Heavily Decorated Classrooms May Distract Young Children

अति सजवलेल्या वर्गांमुळे शिक्षणात अडथळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - विविध नकाशे, पाढे, आकृत्यांनी प्राथमिक शाळेतील वर्ग खोल्यांच्या भिंती सजवल्या जातात. या माध्यमातून मुलांमध्ये शिक्षणाविषयी आकर्षण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, वर्गातील या सर्व साहित्याच्या भडिमारामुळे शिकताना मुले विचलित होत असल्याचे नव्या अभ्यासात उघड झाले आहे.
शिक्षक वर्गात धडा शिकवताना मुलांच्या लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर वर्गात लावण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याच्या परिणामाचा अभ्यास कार्नगी मेलन युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी केला. अन्न व्ही. फिशर, कॅरी ई. गोडविन आणि हॉवर्ड सेल्टमन यांनी केलेल्या अभ्यासात वर्ग जास्त सजविलेले असतील तर मुले जास्त विचलित होतात, शिकताना त्यांचे लक्ष लागत नसल्याचे दिसून आले. वर्ग जास्त प्रमाणात सजविलेले नसतील तर मुलांना धड्यातील आशय समजायला लवकर मदत होते. लहान मुलांचा भिंतीवरील दृश्य पाहण्यात बराच वेळ जातो.
वर्गातील दृश्यांमुळे मुलांच्या शिकण्याच्या क्षमतेत कसा परिणाम होतो हे आम्ही
दाखवून दिल्याचे डायटरिच कॉलेज ऑफ हुमॅनिटीज अँड सोशल सायन्सेसमधील असोसिएट प्रोफेसर व संशोधनाचे प्रमुख फिशेर यांनी सांगितले.
किंडरगार्डनच्या 24 मुलांचा अभ्यास
असे असले तरी संशोधनातील निष्कर्ष सर्व शैक्षणिक प्रश्नांवर उत्तर असल्याचा आमचा दावा नाही. या विषयात आणखी संशोधन करणे आवश्यक असल्याचे फिशेर म्हणाले. अभ्यासासाठी किंडरगार्डनच्या 24 विद्यार्थ्यांना विज्ञानाचे 6 प्राथमिक धडे शिकण्यासाठी लॅबोरेटरी क्लासरूममध्ये बसवले होते. तीन धडे जास्त सजवलेल्या वर्गामध्ये शिकवण्यात आले, अन्य तीन वर्ग त्याप्रमाणात बटबटीत नव्हते. अभ्यासाच्या निष्कर्षात कमी सजवलेल्या वर्गांतील मुले ‘कंटेंट’ समजून घेण्यात सरस ठरली.
बडबड करण्याच्या सवयीचीही पाहणी
वर्गातील चित्र हटवल्यानंतरचे परिणामही अभ्यासण्यात आले. चित्र, आकृत्या काढल्यानंतर मुले एकमेकांशी बोलण्यासारख्या अन्य गोष्टीत वेळ घालवतात काय, हे पाहण्यात आले. शिक्षक सलग शिकवत राहिल्यास सजवलेल्या वर्गातील मुले न सजवलेल्या वर्गातील मुलांपेक्षा जास्त विचलित होत असल्याचे दिसून आले.