आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Heavy Cell Phone Use Could Lead To Cancer: Israeli Study

मोबाईलच्या अतिवापरामुळे कर्करोगाचा धोका, इस्‍त्रायलच्‍या शास्‍त्रज्ञांचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेरुसलेम- मोबाईल फोनचा अतिवापर करणा-यांना कर्करोगाचा धोका असल्‍याचा दावा इस्रायलच्‍या शास्‍त्रज्ञांनी केला आहे. यापुर्वीही अनेक शास्‍त्रज्ञांनी संशोधन करुन तशी शक्‍यता वर्तविली होती. परंतु, कोणतेही संशोधन ठाम निष्‍कर्षावर येऊ शकले नव्‍हते. परंतु, मोबाईलचा अतिवापर घातक ठरु शकतो, असेच या संशोधनांमधून सिद्ध होते. .

गेल्‍या काही वर्षांमध्‍ये मोबाईलचा वापर प्रचंड वाढला आहे. संभाषणासोबतच इंटरनेटसाठीही स्‍मार्टफोन्‍स वापरले जातात. याचे फायदे आहेत. परंतु, तेवढेच धोकेही आहेत. इस्रायलच्‍या आंतरराष्‍ट्रीय कर्करोग संशोधन संस्‍थेने मोबाईलच्‍या वापरावर एक संशोधन केले. त्‍यातून काही खळबळजनक निष्‍कर्ष काढण्‍यात आले आहेत. मोबाईलमधून उत्‍सर्जित होणा-या इलेक्‍ट्रोमॅग्नेटीक व इतर लहरींमुळे कर्करोग होण्‍याचा धोका आहे.

मोबाईलचा अतिवापर आणि क्‍वचितच वापर करणा-यांचा संशोधकांनी तुलनात्‍मक अभ्‍यास केला. अतिवापर करणा-यांच्‍या लालोत्‍पादक ग्रंथींमध्‍ये (लाळ) प्रमाणाबाहेर रेडिओअॅक्‍टीव्‍हीटी आढळून आली. यामुळे मानवी डिएनएला नुकसान होऊन कर्करोगाच्‍या पेशी विकसित होण्‍याचा धोका आहे. हाच सर्वा‍त मोठा धोका असल्‍याचे शास्‍त्रज्ञांचे म्‍हणणे आहे.

महिन्‍यातून कमीत कमी 8 तास मोबाईल फोनवर बोलणा-या 20 जणांची लाळ शास्‍त्रज्ञांनी तपासली. अतिवापर करणा-याचा निकष किमान 8 तासांपासून 30 ते 40 तासांपर्यंत होता. अशा संशोधनांमधून ठाम निष्‍कर्ष आतापर्यंत निघालेला नाही. मात्र, अतिवापर धोकादायक असल्‍याचे काही पुरावे या संशोधनातून मिळतात, असे शास्‍त्रज्ञांचे म्‍हणणे आहे.