आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Heavy Gunfire Heard Coming From Nairobi Shopping Mall

केनिया थरारनाट्यः ओलीसांना सोडविण्यात यश, दहशतवाद्यांमध्ये काही अमेरिकीही

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नैरोबी/अबुजा - केनियामध्‍ये दहशतवाद्यांचे थरारनाट्य अद्यापही सुरू असून सर्व ओलीसांना सोडविण्यात यश आले आहे. दहशतवाद्यांमध्ये काही अमेरिकी वंशाचे नागरिक असल्याचे समजते. केनियाच्या लष्कराचे जवान आणि इस्रायली कमांडोंनी जोरदार प्रत्युत्तर देऊन ओलीसांना सोडविले आहे.

कोणत्याही प्रकारची कारवाई केल्‍यास सर्व ओ‍लीसांना ठार मारण्‍याची धमकी 'अल शबाब' या दहशतवादी संघटनेने दिली होती. लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये अजूनही गोळीबार सुरू असल्याचे वृत्त आहे.

अल शबाब या दहशतवादी संघटनेने हा हल्‍ला घडवून आणला आहे. या हल्‍ल्‍यात आतापर्यंत 68 जणांचा मृत्‍यू झाला असून सुमारे 170 नागरिक जखमी झाले आहेत. लष्कराच्या जवानांनी सुमारे एक हजार नागरिकांना मॉल परिसरातून सुरक्षित ठिकाणी पोहोचविले आहे.

दहशतवादी संघटनेचा कमांडर अली मोहम्‍मदने एक इस्‍लामी वेबसाईटवर ही धमकी दिली होती. ख्रिश्‍चनांनी कोणतीही चाल केल्‍यास सर्व ओलीसांना ठार मारण्‍याची परवानगी आम्‍ही मुजाहिदीनांना दिली आहे, असे या धमकीत म्‍हटले होते.

थरारनाट्यात सात भारतीयांचा मृत्यू... अधिक वृत्त वाचण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...