आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Heavy Meteoroid Rain In A City In Russia Leaves Hundreds Of People Injured

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रशियात भीषण उल्‍का वर्षावामध्‍ये 500 जखमी, नागरिकांमध्‍ये दहशत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्‍को- रशियाच्या मध्‍यवर्ती भागात आज अचानक उल्‍का वर्षाव झाला. त्‍यात शेकडो जण जखमी झाले आहेत. या नैसर्गिक आपत्तीमध्‍ये अनेक घरांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.

प्राप्‍त माहितीनसार, युराल भागातील चेल्‍स्‍याबिंस्‍क शहरात सकाळी अचानक उल्का वर्षाव झाला. एका मोठ्या उल्‍केचा स्‍फोट झाल्‍यामुळे हा प्रकार घडल्‍याचा अंदाज आहे. यात सुमारे 500 नागरिक जखमी झाले असून ठिकठिकाणी लहानमोठे स्फोट झाल्याचे वृत्त आहे. उल्का वर्षावात येथील घरांचे मोठे नुकसान झाले असून काचा फुटल्याने बहुतांश नागरिक जखमी झाले आहेत. तीन नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

(फोटोः उल्‍का वर्षाव झालेल्‍या एका इमारतीवर असे दृष्‍य होते. )