Home | International | China | heavy-rain-kills-9-in-china

चीनमध्‍ये मुसळधार पावसाचे 9 बळी; नेपाळमध्‍येही दरड कोसळून 7 ठार

वृत्तसंस्‍था | Update - Sep 17, 2011, 03:14 PM IST

उत्तरेकडील शांक्‍झी प्रांतामध्‍ये गेल्‍या दोन आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे.

  • heavy-rain-kills-9-in-china

    बिजिंग- मुसळधार पावसाने गेल्‍या 24 तासांमध्‍ये 9 जणांचा बळी घेतला आहे. उत्तरेकडील शांक्‍झी प्रांतामध्‍ये गेल्‍या दोन आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्‍यामुळे आतापर्यंत सुमारे 50 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्‍यात आले आहे.
    दोन आठव्‍ड्यांपासून संततधार पाऊस सुरु आहे. सुमारे 60 जिल्‍ह्यांना याचा मोठा फटका बसला आहे. पाऊस थांबलाच नसल्‍यामुळे या परिसरात आता दरड कोसळण्‍याच्‍या घटना वाढू लागल्‍या आहेत. त्‍यात 9 जणांचा मृत्‍यू झाला आहे. सुमारे 5 हजार घरे कोसळल्‍याचीही माहिती सुत्रांनी दिली आहे. पावसामुळे शेतीचेही प्रचंड नुकसान झाले असून जवळपास 65 हजार हेक्‍टर जमिनीवरील लागवड उद्ध्‍वस्‍‍थ झाली आहे. आतापर्यंत घेण्‍यात आलेल्‍या आढाव्‍यानुसार 100 कोटी रुपयांचे नुकसान झाल्‍याचा अंदाज व्‍यक्त करण्‍यात आला आहे. मुसळधार पावसचा तडाखा आणखी 3 ते 4 दिवस कायम राहण्‍याची शक्‍यता आहे.

    नेपाळमध्‍येही दरड कोसळल्‍याने 7 जण ठार
    नेपाळच्‍या पश्चिमेकडील भागात दरड कोसळून 7 जणांचा मृत्‍यू झाला. त्‍यात एका 5 वर्षीय चिमुकल्‍याचाही समावेश आहे. रोल्‍पा जिल्‍ह्यातील मिजिंग या गावामध्‍ये ही घटना घडली. दरड कोसळल्‍यामुळे 8 घरांचे प्रचंड नुकसान झाले. या घटनेत 19 जण जखमी झाले आहेत.

Trending