(छायाचित्र : एपी )
इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये आलेल्या पूरात 73 जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी( ता. पाच) पंजाब आणि पाक व्याप्त काश्मीर प्रांतात मुसळधार पाऊस झाल्याने मोठे पूर आले होते. अनेक घरे पडली,असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले. बहुतेक मृतांची संख्या लाहोर शहरात जास्त होती.
पूरामुळे ग्रामीण आणि शहरी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. पंजाब प्रांतातील 43 जणांचा मृत्यू घरावरील छत कोसळल्याने झाले आहे,असे निसार सानी यांनी सांगितले. सानी हे पंजाब प्रांताच्या
आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख आहेत. विभागाने देशभरात पूरस्थितीबाबत दक्षतेचा इशारा दिला आहे.