आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावॉशिंग्टन - अमेरिका सरकारने मुंबई हल्ल्यातील आरोपी, लष्कर ए तोयबाचा अतिरेकी डेव्हिड हेडलीसाठी न्यायालयाकडे 30-35 वर्षांची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. शिकागो न्यायालय या प्रकरणाचा निकाल गुरुवारी देणार आहे. दरम्यान, अमेरिकेने हेडलीला भारताच्या ताब्यात देण्यास नकार दिला आहे. हेडली येथे माफीचा साक्षीदार आहे. सरकार आणि त्याच्यात झालेल्या करारात त्याला भारतात न सोपण्याची अट घालण्यात आली होती. वकील गॅरी एस. शापिरो यांनी शिकागो न्यायालयात हेडलीविरोधात 20 पानी आरोपपत्र सादर केले. त्यात हेडली सात वर्षांपासून अतिरेकी कारवायांसाठी मदत पुरवत असल्याचे सांगण्यात आले. मुंबई हल्ल्यामध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी त्याने दिलेल्या माहितीवरून अतिरेक्यांनी हा हल्ला घडवला होता.
हेडलीने दहशतवादी हल्ल्याच्या कटात महत्त्वाची भूमिका निभावल्याचे अमेरिका सरकारने म्हटले आहे. हेडलीच्या कटानुसार, या हल्ल्यात 164 लोकांना प्राण गमावले तर 300 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. मृतांत 28 विदेशी, 10 अमेरिकींचाही समावेश होता. शिकत असताना काही भारतीयांनी शाळेत बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्यामुळे मुंबईवर हल्ला करुन या घटनेचा बदला घेतल्याचा दावा हेडलीने केल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.