हीना रब्बानींचा परराष्ट्रमंत्रिपदाचा / हीना रब्बानींचा परराष्ट्रमंत्रिपदाचा मार्ग प्रशस्त

वृत्तसंस्था

Jul 19,2011 03:20:43 AM IST

इस्लामाबाद. हीना रब्बानी खार या पाकिस्तानच्या नवीन परराष्ट्रमंत्री असतील. या पदाच्या खुर्चीचा त्यांचा मार्ग सोमवारी पंतप्रधानांनी प्रशस्त करून दिला आहे. त्या देशाच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री असतील.

पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांनी यासंदर्भातील प्रस्ताव राष्ट्रपती असिफ अली झरदारी यांना पाठविला आहे. खार यांच्याकडे या खात्याच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी असेल. दुसरीकडे त्या पुढील आठवड्यात भारताच्या दौ-यावर येतील, असे सूत्रांनी सांगितले. शाह महेमूद कुरेशी यांच्यानंतर हे पद रिक्त झाले होते. खार यांच्या नावाची अनेक दिवसांपासून चर्चा होती. आज त्याच्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु याविषयीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. २६-२७ जुलै या दरम्यान भारत-पाक यांच्यातील परराष्ट्रमंत्री यांच्यात बैठक होणार आहे.X
COMMENT