Home | International | Pakistan | heena rabbani says

द्विपक्षीय संबंधाला दिशा देण्यास प्राधान्य : हीना रब्बानी

वृत्तसंस्था | Update - Jul 23, 2011, 03:59 AM IST

उभय देशांतील द्विपक्षीय संबंधाला दिशा देण्यास प्राधान्य राहील, असे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार यांनी सांगितले.

  • heena rabbani says

    इस्लामाबाद. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांच्यासोबत पुढील आठवड्यात होणा-या चर्चेमध्ये उभय देशांतील द्विपक्षीय संबंधाला दिशा देण्यास प्राधान्य राहील, असे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार यांनी सांगितले. या बैठकीतून भविष्यातील चर्चेची दिशा निश्चित केली जाणार आहे.
    पाकिस्तानसोबतच्या चर्चेसाठी भारताने सकारात्मक पाऊल उचलले आहे. दोन्ही देशांमध्ये समस्या उत्पन्न करणा-या मुद्द्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला जाईल, असे खार यांनी पीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. भारताला चर्चेसाठी तयार करणे हे पाकिस्तानचे यश आहे. कृष्णा यांच्यासोबतच्या वाटाघाटीआधी परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चेचा आढावा घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. २७ जुलै रोजी होणा-या चर्चेसाठी त्या २६ जुलैला भारत दौ-यावर जाणार आहेत. आयएसआय एजंट फाईच्या अटकेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर तो अमेरिकी नागरिक असल्याचे सांगून त्याची समस्या सोडवण्यास तो सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.

Trending