आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडनच्या मध्यवर्ती परिसरात हेलिकॉप्टर कोसळले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनची राजधानी लंडनच्या मध्यवर्ती परिसरात एक हेलिकॉप्टर कोसळले. यात दोन जण ठार झाले आहेत.

पोलिसांनी सांगितले की, थेम्स नदीच्या जवळ सेंट जॉर्ज टॉवर या इमारतीवरील क्रेनवर हेलिकॉप्टर कोसळले. हे निवासी टॉवर असून त्याचे बांधकाम सुरु आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा हेलिकॉप्टर पडले तेव्हा आकाशातून आगीचा गोळाच खाली कोसळत असल्यासारखे दिसत होते. घटनास्थळावरुन आगीचे लोळ आणि धुर निघत असल्याचे लोकांनी सांगितले.

पोलिसांना घटनेची माहिती स्थानिक वेळेनुसार आठ वाजता मिळाली. त्यानंतर रुग्णवाहिका आणि पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले. लंडनच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांच्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर निश्चित उंचीपेक्षा खालुन उडत होते.

पोलिसांनी या अपघातात दोन लोक ठार झाले असल्याचे सांगितले आहे.

लॉगबोरो येथील खासदार निकी मॉर्गन यांनी देखील हा अपघात पाहिल्याचे म्हटले आहे. त्यावेळी ते वॉक्सहॉल स्टेशनकडे निघाले होते.

ते म्हणाले, मी एक मोठा आवाज ऐकला आणि त्यानंतर तिथून धुर निघायाला सुरुवात झाली.