जपानची कंपनी सेनरियोने १९७४ मध्ये मुलांमध्ये लोकप्रिय ठरलेले पात्र "हॅलो किटी' साकारले आहे. त्याचे छायाचित्र खेळणी किंवा मुलांचे कपडे यासह अनेक वस्तूंवर छापलेही जाते. आता तैवानची एअरलाइन्स कंपनी इव्हा एअरने सेनरियोचे लायसन्स घेऊन विमानास हॅलो किटीच्या पात्राने सजवले. इव्हा एअर तैवानहून पॅरिसकडे जाण्यासाठी नवीन विमानसेवा सुरू केली आहे. या मार्गासाठी अशा प्रकारची सजावट करण्यात आली असून बाह्य सजावटीबरोबरच आतील सजावटसुद्धा "हॅलो किटी' कल्पनेवर आधारित आहे. इतकेच नव्हेतर ज्या ट्रेमध्ये वस्तू दिल्या जातील, त्यातही अशीच कल्पना अमलात आणली जात आहे.
इव्हा एअरने हॅलो किटी पात्रास ४० वर्षे पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ अशा प्रकारच्या सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. त्याचबरोबर प्रवाशांनासुद्धा विशेष सुविधा देण्यात येत आहेत.
evakitty.evaair.com