आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hennessey Venom GT Breaks Bugatti Speed Record News In Marathi

जगातील सर्वात सुसाट कार : वेग ताशी 435 किलोमीटर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेतील अभियंत्यांनी जगातील सर्वात सुसाट वेगाने धावणारी कार तयार केली असून ही कार ताशी 435 किलोमीटर वेगाने धावते. हेनेसी या अमेरिकन कंपनीने वेनॉम जीटी ही कार तयार केली आहे. फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमध्ये या कारची टेस्ट रन घेण्यात आली. त्या वेळी ताशी 435 किलोमीटर वेगाने धावून या कारने जगातील सर्वात वेगाने धावणारी कार अशा विक्रमाची नोंद केली.

बुगाटीचा विक्रम मोडला
जगातील सर्वात वेगवान धावणारी कार असा आधीचा विक्रम बुगाटीच्या वेरॉन सुपर स्पोर्ट या कारच्या नावाने नोंदला गेला होता. तिचा वेग ताशी 431 किलोमीटर आहे. हेनेसीच्या वेनॉमने तो मोडीत काढला.

पण गिनीज बुकात नोंद नाही
हेनेसीच्या वेनॉम जीटीने बुगाटीच्या वेरॉन सुपर स्पोर्ट्चा विक्रम मोडीत काढला असला तरीही गिनीज बुकात सध्या तरी बुगाटीचीच नोंद राहणार आहे. कारण गिनीज बुकात नोंद होण्यासाठी कार दोन्ही बाजूंनी त्याच वेगाने धावणे बंधनकारक आहे. नासाच्या लँडिंग धावपट्टीवर वेनॉम एकाच बाजूने धावली.

खास वैशिष्ट्ये
1244 अश्वशक्तीचे इंजिन
1244 किलो वजन
10 लाख डॉलर किंमत (सुमारे 6 कोटी 19 लाख रुपये)
11 वेनॉम जीटी तयार
29 वेनॉम जीटीची निर्मिती होणार.