आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • High Degree Censorship And No Internet Freedom In North Korea

इंटरनेट विश्‍वापासून लांबच आहे उत्तर कोरिया, स्मार्टफोनही खरेदी करता येत नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्हाला वाटत असेल, की सर्व जग इंटरनेटने जोडले गेले आहे तर तुमची समजूत चुकीची आहे. उत्तर कोरिया जगातील असा देश आहे जिथे लोकांना इंटरनेट वापर करण्‍यास परवानगी नाही. यास हुकूमशाहीचे कायदे नसून येथे असलेल्या लष्‍करी शासनाने लादलेले निर्बंध कारणीभूत आहे. इंटरनेटबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानापासूनही कोरियन नागरिकांना दूर ठेवले जाते.
लष्‍करी शासनाने मान्यता दिलेल्या काही निवडक ठिकाणीच तंत्रज्ञान दृष्‍टीक्षेपास पडते. दक्षिण आणि उत्तर कोरियात जमीन-आकाशाचा फरक आहे, असे स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या पत्रविद्याचे संशोधक जॉन एस. नाइट यांनी सांगितले. दक्षिण कोरिया जगाला तंत्रज्ञान आणि आधुनिक उपकरण देते. पण लागूनच असलेल्या उत्तर कोरियामध्‍ये या सर्व गोष्‍टी खूप दूर आहेत.

उत्तर कोरियाच्या नागरिकांसाठी इंटरनेट तशी नवी गोष्‍ट नाही. संगणक स्मार्टफोन आहे. पण ते खूप मर्यादित. त्यातही इंटरनेट नसते. खूप कमी लोकांना स्मार्टफोन खरेदी करण्‍याची परवानगी आहे. जर कोणाला अत्यावश्‍यक गरज असेल, तर त्याला सैन्य अधिका-यांकडून विशेष परवानगी घ्‍यावी लागते.

पुढे वाचा उत्तर कोरियातील इंट्रानेटच्या वापराविषयी...