आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • High Hills Sandal News In Marathi, Divya Marathi, Woman, Shopping

हजार वर्षांची गॅरंटी, पण नाही तुटणार ही सँडल!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - परंपरेने एका पिढीकडून मिळालेले कौटुंबिक दागिने दुस-या पिढीकरिता भेटीच्या स्वरूपात देण्याचे काम आजपर्यंत महिला करत आल्या आहेत. मात्र, आता दागिन्यांसोबत आपल्या हायहिल्स सँडल्सही दुस-या पिढीला आठवणीच्या स्वरूपात देवू शकतात आणि सांगू शकतात की, या सँडल (चप्पल) मला माझ्या आईकडून मिळाल्या आहेत. लंडनच्या एका डिझायनरने एक हजार वर्षे चालणा-या सँडल तयार केल्याने आपल्या चपलांनाही आठवणीच्या रूपात सांभाळून ठेवण्याची संधी महिलांना मिळणार आहे.

बर्मिंघम येथील डिझायनर क्रिस शौलिस यांनी ही एक हजार वर्षाची गॅरंटी असलेली हार्टशेप असलेली हायहिल्स सँडल तयार केली आहे. त्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला. ही सँडल तयार करण्यासाठी स्टेनलेस स्टिल आणि जाड चांदी वापरण्यात आली आहे. सोबतच या चपलींना आरामदायक बनवण्यासाठी सिलिकॉनचे आवरण लावण्यात आले आहे. बाजारात या सँडलची किंमत ही एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. मात्र, इतर महिलांसाठी ती फायदेशीरच आहे. क्रिस यांनी सांगितले की, या सँडलची टेस्ट करण्यासाठी अनेक मॉडेलना ती वापरण्यात देण्यात आली असून, या चपलीतील कच्चे दुवे शोधण्यासाठी सलग 10 तास कॅटवॉकही करून घेण्यात आला आहे. डिझायनर क्रिस यांनी सांगितले की, सँडलच्या रूपावर आपण खूश आहोत. कारण की, महिलांना चालताना त्रास होणार नाही आणि टिकेलही अनेक वर्षे शिवाय दिसायलाही ती सुंदर असेल अशी सँडल तयार करणे खरोखरच कठीण काम होते.

आठवणीच्या रूपात जतन करा
या सँडलविषयी अधिक माहिती देताना क्रिस यांनी सांगितले की, या सँडलसाठी उपयोगात आणलेले बॉर्गिजाई रिवेरा स्टाइलटोसची किंमतच एक लाख रुपये आहे. त्याची मजबुती व अनेक वर्षांपर्यंत चालण्याच्या गॅरंटीमुळे ही किंमतही कमीच वाटते. त्यामुळे या सँडलकडे एक गुंतवणूक म्हणूनही पाहता येऊ शकते. तसेच महिला आपल्या आठवणीच्या रूपात या सँडल दुस-या पिढीला देऊ शकतात.