आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅटर्न पासवर्ड टेक्नोलॉजी झाली लॉन्च, आता जास्त सुरक्षित होणार तुमचा पासवर्ड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेळोवेळी पासवर्ड बदलने ही इंटरनेट युजर्ससाठी एक समस्याच आहे. मात्र आता काळजी करण्याची गरज नाही. आता युजर्स व्हिजव्हल डिझाइनचा पासवर्ड वापरू शकतात. ऐवढेच नाही तर आता तुम्ही टच पासवर्ड म्हणजेच शारिरीक अवयवांचाही पासवर्ड ठेऊ शकता.
हेनोवरमध्ये झालेल्या सर्वात मोठ्या टेक्निकल फेयर सिबिटमध्ये या तंत्रनाचा शोध लावणा-या विन्फ्रासॉफ्टने याचे सादरीकरण केले. डेव्हलपर्सच्या मते स्मार्टफोनच्या या युगात डझनभर पासवर्ड लक्षात ठेवणे म्हणजे डोकेदुखीच आहे.
ब्रिटनच्या सॉफ्टवेअर आणि उपकरणे तयार करणा-या विन्फ्रासॉफ्ट कंपनीचे मॅनिजिंग डायरेक्टर स्टिवन होपच्या मते जास्त पासवर्ड हे विक असतात, त्यामुळे ते सहज हॅक होतात. यूजर्सच्या दृष्टीकोनातून हे पासवर्ड कठीण असतात. कारण त्यांना 20- 30 पासवर्ड्स लक्षात ठेवावे लागतात.
स्टिवन सांगतो, की एकाच यूजर्सला अनेक पासवर्ड्स लक्षात ठेवावे लागतात त्यामुळे युजर्सना ते कठीण वाटते.
अनेक लोक पासवर्ड तयार करताना जास्त विचार न करता '123456' किंवा ' password ' हे पासवर्ड वापरतात. असे सिबिटचे प्रवक्ता हार्टविग वोन सैसने सांगितले. हार्ड विगच्या मते असे पासवर्ड्स सहज हॅक होतात.
यूजर्सची हीच अडचण लक्षात घेऊन विन्फ्रासॉफ्ट चार रंगाच्या ग्रिडचा पासवर्ड तयार केला आहे.
कसे काम करते हे फेसडिटेक्श तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा.