आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hilari Clinton News In Marathi, Chelsy, Divya Marathi

लज्जास्पद! हिलरींच्या राजकारणाशी जोडला चेल्सीच्या न जन्मलेल्या मुलाचा संबंध!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकी मीडिया सध्या एका न जन्मलेल्या मुलाच्या मागे लागला आहे. तो हिलरी क्लिंटन यांची मुलगी चेल्सीच्या गर्भात वाढत आहे. 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीत तो हिलरींसाठी मते ओढेल, अशा गैरसमजात मीडिया आहे.

वॉशिंग्टन पोस्ट - भावी राष्ट्राध्यक्ष जन्म घेईल
या वृत्तपत्राने आपल्या वेबसाइटवर ‘युवर बेबी नेम’ या सदरात तुम्ही सुचवलेले नाव 2052 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाचे दावेदारही असू शकते, असे सांगत लोकांना मुलाचे नाव सुचवण्याचे आवाहन केले आहे.

न्यूयॉर्क पोस्ट - भ्रूणालाच लिहिले पत्र
‘दोन वर्षांनंतर आपण आजीच्या कुशीत बसून त्यांच्यासाठी मते मागू लागलेले असाल. परंतु मोठे झाल्यावर प्रत्येक गोष्ट हक्काने परत घ्या. अमेरिकेवर राज्य करणारे तुम्ही कदाचित तिसरे किंवा चौथे क्लिंटन असू शकाल.’

फॉक्स न्यूज :
मूल नियोजितच

‘मीडिया बझ’ कार्यक्रमात मूल आधीपासूनच नियोजित आहे. पण त्यामुळे हिलरीची राष्ट्राध्यपदाची दावेदारी भक्कम होणार नाही. कारण मूल या जगात येईपर्यंत त्या खूपच म्हाता-या झालेल्या असतील, पाहुण्यांमध्ये जोरदार चर्चा झडली.

आमच्या मीडियाने आखली होती लक्ष्मणरेषा
आपल्याकडे मीडियाने ऐश्वर्या राय-बच्च्नचे गरोदरपण व मुलाच्या जन्माच्या वार्तांकनाबाबत लक्ष्मणरेषा आखून घेतली होती. बच्च्न कुटुंबाच्या अधिकृत घोषणेनंतरच सर्व बातम्या दिल्या होत्या. जन्माच्या आधी किंवा नंतर कंड्या पिकवल्या नव्हत्या.