आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hilary Clinton Reveals How Barack Obama Forcibly Prevented China\'s \'secret\' Meeting With India To Isolate US

भारत-चीन नेत्यांच्या बैठकीत जेव्हा ओबामा बळजबरी घुसले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - भारत आणि चीन एकत्र आले तर अमेरिकेविरुद्ध एक होतील अशी भीती राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना वाटत होती. त्यामुळेच या दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या गुप्त बैठकीत अचानक उपस्थित राहून ओबामा यांनी सर्वांना चकित केले होते. ही बैठक 2009 मध्ये डेनमार्कची राजधानी कोपेनहेगन येथे चालू होती. या बैठकीसाठी भारताचे तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि चीनचे वेन जिआबाओ आणि इतर काही महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
अमेरिकेच्या तत्कालिन परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी त्यांच्या 'हार्ड चॉइसेस' या पुस्तकात या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. पुस्तकात लिहिले आहे, की चीनचा उद्देश भारत, ब्राझील आणि दक्षिण अफ्रिका यासारख्या देशांना एकत्र करुन अमेरिकेला वेगळे आणि एकटे पाडायचे. मात्र, ओबामा यांच्या तत्परतेने चीनचा हा इरादा हाणून पाडला.
त्या लिहितात, कोपेनहेगनमध्ये जलवायू परिवर्तनावर आयोजित आंतरराष्ट्रीय संमेलनात आम्ही पंतप्रधान जिआबाओ यांची भेट घेण्याचा प्रयत्न करीत होतो. मात्र, चीनने अमेरिकेकडे कानडोळा केला होता.

पुढील स्लाइडमध्ये, गार्ड बंदूक ताणेपर्यंत मी आत प्रवेश केला